ऑनलाइन फ्रॉड झाल्यास फिरवा हा नंबर अन‌् पैसे परत मिळवा!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल आणि गृह मंत्रालयाने लोकांच्या मदतीसाठी एक हेल्पलाइन नंबर जारी केले आहे.

या ठिकाणी कोणताही तुमच्या अकाऊंटमधून ऑनलाइन पैसे काढून घेतल्यास, आता घाबरू नका, त्यासाठी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने हेल्पलाइन सुरू केली आहे.

त्या नंबरवर डायल करून तक्रार केल्यास तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात. गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांची सायबर सेलने मिळून १५५२६० हेल्पलाइन सुरू केली आहे.

यावर डायल केल्यास ७ ते ८ मिनिटात अकाउंटवरून काढण्यात आलेली रक्कम ज्या दुसऱ्या अकाउंटमध्ये गेली आहे.

त्या हेल्पलाइनवरून त्या बँक किंवा आर्थिक संस्थेला अलर्ट मेसेज मिळेल. त्यानंतर पैसे होल्डवर जातील. या हेल्पलाइनची दहा लाइन आहे. म्हणजेच कॉल करणाऱ्यांना हा नंबर बिझी मिळणार नाही.

ज्यावेळी कोणताही व्यक्ती हेल्पलाइन नंबरवर कॉल करेल. तर त्यावेळी त्याला त्याचे नाव, नंबर आणि फ्रॉडची वेळ विचारली जाईल.

माहिती एकत्रित केल्यानंतर त्यासंबंधित जोडलेले पोर्टल, संबंधित बँक किंवा अर्थ संस्थेला पोहोचवली जाईल. ज्यावेळी फ्रॉड झाला त्यावेळी तात्काळ तक्रार केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो.

त्यामुळे तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. गृह मंत्रालयच्या सायबर पोर्टल आणि दिल्ली पोलिस सायबर सेल सोबत १५५२६० पायलट प्रोजेक्ट गेल्या वर्षापासून ऑनलाइन फ्रॉड रोखण्यासाठी सुरू करण्यात आला होता. आता हे फुल पॉवर सोबत लाँच करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|