विनाकारण फिरणाऱ्यांना वेसण घालण्यासाठी पाेलिसांनी केली याची ‘सक्ती’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- मुंबईत विनाकारण फिरणाऱ्यांना वेसण घालण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

खासगी वाहनांसाठी तीन कलर कोड निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित वाहनांना स्थानिक पोलीस स्टेशनमधून हा कलर कोड स्टिकर मिळणार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज एक व्हिडिओ संदेश जारी करत कलर कोड सक्तीची घोषणा केली.

संचारबंदी काळातही मुंबईतील रस्त्यांवर वाहनांचा मुक्तसंचार सुरू असल्याने तसेच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याने मुंबई पोलिसांनी हा कठोर निर्णय घेतला आहे. याबाबत नगराळे यांनी माहिती दिली.

कलम १४४ नुसार मुंबई शहरात फक्त विशिष्ट कलर कोड असलेल्या गाड्यांनाच परवानगी दिली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेसाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरात असलेल्या खासगी वाहनांसाठी हे तीन कलरचे कोड बंधनकारक केले आहेत.

त्यात अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर पिवळा कलर कोड असणार आहे. मेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा कोड असणार आहे आणि भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कलर कोड असणार आहे.

कलर कोडचा दुरूपयोग केल्यास कलम ४१९ व इतर कलमांतर्गत कारवाई केली जाणार, असे नगराळे यांनी सांगितले.

हे स्टिकर संबंधितांनी पोलीस स्टेशनमधून घ्यावे, असेही सांगण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लगेचच सुरू करण्यात आली असून काही ठिकाणी थेट रस्त्यावरच अशी वाहने थांबवून त्यांना स्टिकर लावण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|