आनंद वार्ता : एप्रिलअखेरपर्यंत ओसरू शकते कोरोनाची लाट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोक ज्या वेगाने बाधित होत आहेत. तितक्याच वेगाने ही लाट ओसरू शकते, असे या संशोधनामध्ये म्हटले आहे.

तसेच एप्रिलच्या अखेरीपर्यंत देशातील ४० टक्के लोकसंख्येमध्ये अँटीबॉडी विकसित होतील, असा अंदाज क्रेडिट सुसे या संशोधनामधून वर्तवण्यात आला आहे.

या संशोधनामध्ये म्हटले आहे की, गेल्यावर्षी डिसेंबरच्या अखेरीस देशातील २१ टक्के लोकसंख्येमध्ये अँटीबॉडी विकसित झालेली होती. एप्रिलच्या अखेरीच यामध्ये ७ टक्के लोकसंख्येची भर पडण्याची शक्यता आहे.

तर लसीकरणाच्या माध्यमातून देशातील १२ टक्के लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्ती विकसित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे देशातील ४० टक्के लोकसंख्या ही कोरोनापासून मृत्यूच्या धोक्याबाहेर जाईल.

तर २८ टक्के लोकसंख्येमध्ये संसर्गामुळे प्रतिकारशक्ती विकसित हाेऊ शकते. त्याशिवाय १२ टक्के लोक हे एप्रिलपर्यंत कोरोनाविरोधातील लसीचा पहिला डोस घेतील.

दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांपैकी ८७ टक्के लोक हे ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत, असे या संशोधनामध्ये म्हटले आहे. दरम्यान,

दुसरीकडे लँसेट कोविड-१९ आयोगाने भारतात कोरोनाची दुसरी लाट वेळीच थोपवली गेली नाही तर जून २०२१ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत देशात दररोज १ हजार ७५० ते २ हजार ३२० मृत्यू होतील, अशी भीती व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसेल, असेही या अहवालात म्हटले आहे. सध्या संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेशी झुंजत आहे.

पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्रतेने आलेल्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे देशातील विविध राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|