Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २३१२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १४ हजार ६४२ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३५९२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १९९०५ इतकी झाली आहे.

Advertisement

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७१३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९६७ आणि अँटीजेन चाचणीत १९१२ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७६, अकोले ६७, जामखेड ४८, कर्जत ७०, कोपरगाव २६, नगर ग्रामीण ५२, नेवासा ३०, पारनेर ३६, पाथर्डी ५८, राहता २१, राहुरी ३२, संगमनेर ११, शेवगाव ०७, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर ०७, कॅंटोन्मेंट बोर्ड २८, मिलिटरी हॉस्पिटल १२ आणि इतर जिल्हा ०२ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Advertisement

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३८०, अकोले २५, जामखेड ०३, कर्जत ०८, कोपरगाव २१, नगर ग्रामीण ६८, नेवासा ०९, पारनेर १५, पाथर्डी २३, राहाता ८१, राहुरी १३, संगमनेर १३५, शेवगाव १४, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर २२, कॅंटोन्मेंट बोर्ड २९ आणि इतर जिल्हा ९४ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज १९१२ जण बाधित आढळुन आले.

मनपा २९३, अकोले ९७, जामखेड २९, कर्जत ८१, कोपरगाव ९७, नगर ग्रामीण २२७, नेवासा १६७, पारनेर ७३, पाथर्डी ११४, राहाता २१०, राहुरी १५७, संगमनेर ७१, शेवगाव १३२, श्रीगोंदा ४४, श्रीरामपूर ६९, कॅन्टोन्मेंट बोर्ड २० आणि इतर जिल्हा ३१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Advertisement

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४९८, अकोले १७०, जामखेड ४८, कर्जत १३२, कोपरगाव १०७, नगर ग्रामीण १८५, नेवासा ५९, पारनेर १३३, पाथर्डी ५७, राहाता २७८, राहुरी १४२, संगमनेर ६७, शेवगाव ६५, श्रीगोंदा ३९, श्रीरामपूर २३७, कॅन्टोन्मेंट ८५, मिलिटरी हॉस्पिटल ०६ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:१,१४,६४२
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:१९९०५
  • मृत्यू:१५८२
  • एकूण रूग्ण संख्या:१,३६,१२९
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li