Breaking News Updates Of Ahmednagar

घराबाहेर पडाल तर रवानगी होईल पोलीस ठाण्यात !

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत,रविवारी विकेंड लॉकडाऊनला नगर शहरासह जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

मेडिकलचे दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलेली होती. चारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर शहरामध्ये मोठ्या फौजफाट्यासह संचलन करून बंदचा आढावा घेतला.

Advertisement

दरम्यान जो कोणी विनाकारण फिरत आहे, त्याला आम्ही पोलीस ठाण्यामध्ये आणून फिरण्याचे कारण योग्य नसल्याचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अधीक्षक पाटील यांनी यावेळी दिली आहे.

शनिवार व रविवार असल्यामुळे विकेंड लॉकडाऊनचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. त्यानुसार रविवारी अधीक्षक पाटील यांनी आपल्या पथकासह शहरातील पाईपलाईनरोड,

Advertisement

प्रोफेसर कॉलनी चौक, पत्रकार चौक, भिंगार शहर, माळीवाडा परिसर, कापडबाजार, नवी पेठ, दिल्ली गेट आदी ठिकाणी भेटी दिल्या. घराबाहेर पडणार्‍या लोकांकडे अधीक्षक पाटील यांनी स्वत: विचारणा केली.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, सकाळी सात ते अकरा यावेळेत वस्तू खरेदी करण्यासाठी सूचना दिल्या आहेत, नियमांचा वापर केला पाहिज, फक्त मेडिकलच्या संदर्भात मुभा देण्यात आली आहे.

Advertisement

विनाकारण कोणीही बाहेर पडू नये, असेे ते म्हणाले. अधीक्षक पाटील म्हणाले, अत्यावश्यक असेल तरच नागरिकांनी बाहेर पडले पाहिजे.

त्यांना पोलिसांकडून अडविले जाणार नाही.परंतू विनाकारण बाहेर पडत असेल तर त्यांना अटकाव केला जाईल. वेळप्रसंगी त्यांना पोलीस ठाण्यांमध्ये नेऊन त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाईल.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li