महाराष्ट्र लढेल आणि जिंकेल…जय महाराष्ट्र !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रास ११२१ व्हेंटिलेटर्स, १७०० उत्तरप्रदेशला, १५०० झारखंडला, १६०० गुजरातला, १५२ मध्यप्रदेशला आणि २३० छत्तीसगढला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

यांची माहिती…तरी महाराष्ट्र लढेल आणि जिंकेल…जय महाराष्ट्र, असे ट्वीट करत राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत असल्यानं आरोग्य सुविधा कमी पडू लागल्या आहेत. त्यामुळे राज्याकडून केंद्राकडे मागणी केली जात आहे. महाराष्ट्राशी केंद्र सरकारकडून दुजाभाव केल्याचा आरोपही होत आहे.

याच मुद्द्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आकडेवारी मांडत केंद्राला उत्तर दिलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना प्रभावित ११ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचा शनिवारी आढावा घेतला.

या बैठकीला महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. मंत्री आव्हाड यांनी या बैठकीची माहिती देणारी बातमी शेअर केली आहे. त्यातील आकडेवारीचा हवाला देत केंद्र सरकारवर टीका केली.

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये त्या तुलनेत करण्यात आलेल्या वाढीविषयीही त्यांनी माहिती दिली. “कोविड रूग्णांवर त्यांच्या आरोग्याच्या गांभीर्यानुसार, उपचार करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या

त्रिस्तरीय आरोग्य सुविधांअंतर्गत, २०८४ समर्पित कोविड रुग्णालये (यापैकी ८९ केंद्राकडे तर उर्वरित १९९५ राज्यांकडे आहेत) ४०४३ समर्पित कोविड आरोग्य केंद्रं आणि १२,६७३ कोविड शुश्रुषा केंद्रं आहेत.

या सर्व केंद्रांमध्ये एकूण १८,५२,२६५ खाटा आहेत. त्यापैकी ४,६८,९७४ खाटा समर्पित कोविड रुग्णालयांमध्ये आहेत. यावेळी, राज्यांना नव्या जीवनरक्षक प्रणालींचा पुरवठा केला जाईल, असे आश्वासन डॉ. हर्षवर्धन यांनी दिले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|