कोरोना काळात नागरिकांवर पाण्यासाठी भटकंतीची वेळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गोळेगाव येथील सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर कोरडी पडली असून ऐन कोरोना च्या संकट काळात लोकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

तालुक्यातील सर्वात मोठा पाझर तलाव म्हणून गोळेगाव येथील तलावाची ओळख आहे विशेष आज तलावात पाणी देखील आहे मात्र सार्वजनिक पाणीपुरवठाची विहीर तलावा पासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असून

नदीपत्रालागत मोठ्या प्रमाणात खासगी विहिरी आहेत त्यामुळं दरवर्षी मार्च नंतर पाणीटंचाई चा सामना करावा लागतो. तलाव उशाला असून देखील गोळेगावकरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आज आली आहे.

अनेक वर्षांपासून मार्च नंतर तलाव क्षेत्राकडील विहिरी अधिग्रहित करून ग्रामस्थांची तहान भागवण्याचं काम केलं जातं होत मात्र गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायत ने विहीर अधिग्रहित केलेले प्रस्ताव नामंजूर केले गेले

पर्यायाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला व पदाधिकार्यांचा ग्रामस्थांच्या व विहीर मालकाच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

मात्र या वर्षी गावात बरेचसे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून जेणे करून लोक पाण्यासाठी एकत्र येऊन संसर्ग होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेण्याची गरज आहे

ग्रामसेवक यांनी लवकरात लवकर शेतकऱ्याच्या विहीर अधिग्रहित चा प्रस्ताव सादर करावा व प्रशासनाने तात्काळ परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून प्रस्तावास तात्काळ मंजुरी द्यावी

पर्यायाने प्रत्येक कुटुंबाला ज्याच्या त्याच्या घरी पाणी आज पर्यंत होत तस पुढेही देता येईल लोकांचा एक दुसऱ्याशी संपर्क होणार नाही व कोरणाचा संसर्ग टाळण्यासाठी मदत होईल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|