‘या’ आमदार म्हणतात; कोरोनावर आत्मविश्वासाने मात करा!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-कोरोना बाधितांनी घाबरून न जात आत्मविश्वासाने कोरोना या आजारावर मात केली पाहिजे. योग्य उपचार आणि सकारात्मक विचार कोरोनाच्या काळात असणे गरजेचे आहे.

सध्या कोरोनाची परिस्थिती बिकट असून नागरिकांनी स्वतःची जबाबदारीने काळजी घ्यावी.असे आवाहन शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी केले.

पाथर्डी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह, नवजीवन वस्तीगृह येथील कोवीड केअर सेंटरला आमदार राजळे यांनी भेट देऊन पाहणी केली. येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाशी संवाद साधून येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.

यावेळी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, कोरोना बाधितांना कोणत्याही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी आरोग्य यंत्रणा अथवा मला थेट संपर्क करा, असे देखील त्या म्हणाल्या.

त्याचसोबत दैनंदिन जेवण ,औषध उपचार आणि दररोज यापरिसरातील स्वच्छतेच्या बाबतीत आमदार राजळे यांनी सूचना केल्या.

तालुक्यात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. पाथर्डी शहरातील आबासाहेब काकडे वसतिगृह,तिसगाव येथील नर्सिग हॉस्टेल,मोहटादेवी भक्त निवास,माळी बाभुळगाव

येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह ,नवजीवन वस्तीगृह, याठिकाणी कोव्हीड केअर सेंटर मध्ये बाधित रुग्णावर प्राथमिक उपचारची सोय तालुका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तर उपजिल्हा रुग्णालयामध्ये हेल्थ सेंटर सुरु आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|