Breaking News Updates Of Ahmednagar

मोठा निर्णय : १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला मिळणार कोरोना लस

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार आहे.

आतापर्यंत ४५ वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोना लस दिली जात होती. देशभरातील १२.३८ कोटी लोकांनी कोरोनाचा पहिला किंवा दुसरा डोस घेतला आहे.

Advertisement

, व्हॅक्सीन तयार करणाऱ्या कंपन्या आपला ५० टक्के पुरवठा केंद्राला करण्याचा, तर इतर ५० टक्के पुरवठा राज्य सरकारांना किंवा ओपन मार्केटमध्ये देता येईल.

लसीकरणासाठी कोविनद्वारे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. देशात करोनावरील लसीकरणासाठी सरकारी केंद्र आणि खासगी रुग्णालयामध्ये लस घेता येणार आहे.

Advertisement

सरकारी केंद्रांवर मोफत लस दिली जात आहे. तर खासगी रुग्णालयात एका डोससाठी २५० रुपये आकारले जात आहेत.

सोमवारी पंतप्रधानांची काही औषध कंपन्यांसोबत देखील बैठक झाली. भारतात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लस दिल्या जात आहेत.

Advertisement

स्पुटनिक व्हीला सुद्धा आपात्कालीन मंजुरी देण्यात आली. त्यामुळे लसीकरण मोहीमेला येत्या दिवसात वेग येणार असल्याचे दिसत आहे.

वेगाने फैलावणाऱ्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी श्वसनयंत्रे, प्राणवायू आणि औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला होता.

Advertisement

त्याचबरोबर खासगी आणि सरकारी औषधनिर्मिती क्षेत्रांनी पूर्ण क्षमतेने लसउत्पादन करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.

देशात गेल्या ९२ दिवसांत १२ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. वेगाने लसीकरण करणाऱ्या देशात भारत समाविष्ट आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li