Breaking News Updates Of Ahmednagar

देशव्यापी लॉकडाऊन काय म्हणतात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा?

अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-  केंद्र सरकारने तीन महिन्यांपूर्वीच राज्यांना स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.

लॉकडाऊनसारखे उपाय राज्यांना आपापल्या पातळीवर घ्यावे लागतील, कारण विविध राज्यांतील परिस्थिती वेगवेगळी आहे.

Advertisement

त्यामुळे राज्यांनीच स्वतः निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेणं योग्य राहील. गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात केंद्रानं कोरोनाशी लढा देण्यासाठी मुलभूत सुविधा उभारल्या आहेत,

असं सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावली. अमित शाह यांनी एका वृत्तवाहिनाला मुलाखत दिली.

Advertisement

या मुलाखतीत बोलताना त्यांनी कोरोनासह देशातील विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारची भूमिका मांडली.

कोरोनामुळे देशात बिकट परिस्थिती निर्माण झाल्यानं देशात पुन्हा लॉकडाऊन लावण्याबद्दल केंद्राच्या भूमिकेबद्दल शाह यांना प्रश्न विचारण्यात आला होता.

Advertisement

त्यावर त्यांनी वरील उत्तर दिले. कुंभ असो किंवा रमजान असो कुठेही कोरोनासंदर्भातील नियम पाळल्याचे दिसून आलं नाही. असं वागणं चुकीचं आहे.

त्यामुळेच आम्ही आवाहन केलं आणि आता कुंभमेळा प्रातिनिधिक पद्धतीने साजरा करावा. सध्या ज्या वेगानं करोना विषाणूचा प्रसार होत आहे, त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र या दुसऱ्या लाटेविरोधातील लढाई आपण जिंकू असा मला विश्वास आहे.

Advertisement

केंद्राने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरून लक्ष हटवल्याच्या आरोपावर बोलताना अमित शाह म्हणाले, असे म्हणणे चुकीचे आहे.

कोरोनाविरोधी लढ्यात केंद्र कुठेही कमी पडलेले नाही. कोरोना परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या भारतात सर्वाधिक आहे.

Advertisement

त्याचबरोबर मृत्यूदरही कमी आहे. दुसरी लाट फक्त भारतातच नाही, तर अनेक देशांमध्ये आलेली आहे. करोनाविरोधी लढाईलाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम आहे, असेही शाह म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li