Breaking News Updates Of Ahmednagar

अरणगावच्या कोविड सेंटरला अत्यावश्यक औषधांची मदत

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अरणगाव (मेहेराबाद) येथे सुरु करण्यात आलेल्या शंभर बेडच्या कोविड सेंटरला शिवमुद्रा फाउंडेशनच्या वतीने आवश्यक असलेल्या औषधांची मदत देण्यात आली.

फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब दरेकर यांनी औषधे कोविड सेंटरकडे सुपुर्द केले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष गजेंद्र भांडवलकर,

Advertisement

वाळकी येथील वैद्यकीय अधिकारी व कोविड केअर सेंटरचे नोडल ऑफिसर डॉ.अनिल ससाणे, डॉ. प्रणाली पोटे, शारदा खताळ, किशोर साठे आदींसह आरोग्य सेवक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

दादा दरेकर म्हणाले की, शहरासह संपुर्ण जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना अरणगाव (मेहेराबाद) येथील कोविड सेंटरमध्ये पंचवीस ते तीस रुग्ण उपचारासाठी भर्ती होत आहे.

Advertisement

या कोविड सेंटरमध्ये औषधांची कमतरता भासत असताना सामाजिक भावनेने पुढाकार घेऊन मदत देण्यात आली आहे. राजकीय पदावर नसताना देखील केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोना रुग्णांना आधार देण्यासाठी शिवमुद्रा फाउंडेशनने पुढाकार घेतला.

कोरोनाने परिस्थिती गंभीर होत असताना अनेकांना बेड तर औषधे उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Advertisement

नगर तालुक्यात कोणताही राजकीय पुढारी बाहेर पडलेला नसताना, गरजू रुग्णांना लागणारी वैद्यकिय मदत उपलब्ध करुन देण्याचे कार्य शिवमुद्रा फाउंडेशन, दादासाहेब दरेकर व गजानन भांडवलकर मित्र मंडळाच्या वतीने सुरु असल्याचे सांगितले.

तर या कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या पाठिशी उभे राहून त्यांना आधार देत असल्याचे स्पष्ट केले.

Advertisement

वाळकी येथील वैद्यकीय अधिकारी व नोडल ऑफिसर डॉ.अनिल ससाणे यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करुन आभार मानले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li