Breaking News Updates Of Ahmednagar

गुंड गजा मारणेला मदत करणे पडले महागात माजी खासरादाराची तुरूंगात रवानगी

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कारागृहातून सुटल्यानंतर तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत गुंड गजा मारणे याने मोठी मिरवणूक काढली होती.

या मिरवणुकीला मदत करण्याऱ्या भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांना पुण्याच्या गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली.

Advertisement

तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत गुंड गजा मारणे मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीत जवळपास तीनशेहून अधिक चार चाकी वाहने सहभागी झाली होती.

या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, राज्यभरात एकच चर्चा सुरू झाली.

Advertisement

त्यानंतर तळोजा ते पुण्या पर्यंत येणाऱ्या पोलिस स्टेशनमध्ये गजा मारणे आणि सहभागी झालेल्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यातील काही आलिशान गाड्या देखील जप्त करण्यात आल्या. त्याच दरम्यान गजा मारणेला अटक करून येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

Advertisement

तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांवर माध्यम व सामाजिक स्तरातून टीकेची झोड उठली.

त्यानंतर आपल्याला अटक होणार हे लक्षात आल्यानंतर गजा मारणे पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता.

Advertisement

सहा मार्च रोजी गजा मारणे गाडीतून मेढा येथे आल्याची माहिती मिळताच गजा मारणे असल्याची खात्री पटताच त्याला पोलिसांना शरण येण्यास सांगण्यात आले.

यानंतर त्याला फिल्मी स्टाईलने त्याला पकडण्यात आले. त्याला नंतर पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यानंतर अनेक मोठ्या लोकांची नावे गजा मारणेच्या मिरवणुकीमध्ये समोर आली आहेत.

Advertisement

आता तर थेट भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी गजा मारणेला मिरवणुकी करिता मदत केल्या प्रकरणी आज गुन्हे शाखेने अटक केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li