देवदत्त ! ऑक्सीजन सिलेंडर पोहचवण्यासाठी चक्क त्याने 23 लाखांची गाडी विकली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या संकटमय काळात ऑक्सीजनची कमतरता जीवनासाठी संकट ठरत आहे.

अशा स्थितीत संपूर्ण देशाला ऑक्सीजनच्या मोठ्या टंचाईचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे मुंबईच्या मालाडमध्ये राहणारा एक व्यक्ती गरजूंसाठी देवदूत ठरला आहे.

मुंबईत राहणार्‍या शाहनवाज शेख यांनी मृत्यूच्या दाढेखाली चाललेल्या लोकांना नवे जीवन देण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे, ज्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

शाहनवाज शेख एका फोन कॉलवर कोरोना रुग्णांपर्यंत ऑक्सीजन पोहचवण्याचे काम करत आहेत.

लोकांच्या मदतीसाठी तैनात त्यांच्या टीमने यासाठी एक ‘कंट्रोल रूम’ सुद्धा बनवला आहे, ज्याद्वारे रूग्णांना वेळेवर ऑक्सीजन मिळावा आणि संकटाच्या काळात त्यांना दारोदार हिंडावे लागू नये.

आपल्या या पवित्र कामामुळे शाहनवाज हे आता ‘ऑक्सीजन मॅन’च्या नावाने ओळखले जात आहेत.

ऑक्सीजन सिलेंडरसाठी त्याने 23 लाखांची गाडी विकली शाहनवाज यांनी सांगितले की, लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी 22 लाख रुपयांची एसयुव्ही विकली.

आपली फोर्ड एंडेव्हर गाडी विकल्यानंतर त्यांना जे पैसे मिळाले, त्या पैशातून शाहनवाज यांनी गरजूंसाठी 160 ऑक्सीजन सिलेंडर खरेदी करून आणले.

शाहनवाज यांनी म्हटले की, मागील वर्षी लोकांची मदत करताना त्यांच्याकडील पैसे संपले, ज्यानंतर त्यांनी आपली एसयुव्ही कार विकण्याचा निर्णय घेतला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|