Breaking News Updates Of Ahmednagar

आ.लंकेना कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्ष करा, सेनेच्या ‘ या’ नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- कोरोना रुग्णांची सेवा करण्यात आ.निलेश लंके यांचा सर्वाधिक मोठा वाटा आहे.

दुसरीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जिल्ह्यासाठी वेळ नसल्याने पारनेरचे आ.लंके यांना जिल्हा कोरोना नियंत्रण समितीचे अध्यक्षपद द्या अशी मागणी शिवसेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे निवेदन पाठवून मागणी केली आहे.

Advertisement

जिल्हाप्रमुख झावरे यांनी म्हंटले की, राज्यभर कोरोना महामारीने थैमान घातले असून आपल्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार त्यास समर्थपणे तोंड देत आहे. अहमदनगर जिल्हयातील परिस्थितीही राज्यापेक्षा वेगळी नाही.

मात्र कोरोना व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी यांच्याव्यतीरिक्त कोणीही पुढाकार घेत नसल्याचे जिल्हयात चित्र आहे.

Advertisement

पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी १ हजार १०० बेडचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर उभारून तेथे रूग्णांंवर मोफत उपचार करण्यात येउन सर्व सुविधाही मोफत पुरविण्यात येत आहेत.

खाजगी रूग्णालयांमधील रूग्णांना लागणारे रेमडेसिवेर इंजेक्शन, ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मोलाची कामगिरीही आ. लंके यांनी करून आदर्श निर्माण केलेला आहे.

Advertisement

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्येही आ. लंके यांनी कर्जुले हर्या येथेही एक हजार बेडचे कोव्हीड सेंटर सुरू करून तब्बल साडेचार हजार रूग्णांना मोेफत उपचार तसेच सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.

रेमडेसिवेर इंजेक्शचा मोठया प्रमाणावर काळा बाजार जिल्हयामध्ये सुरू आहे. महाविकास आघाडीविषयी जिल्हयात सकरात्मक वातावरण आहे.

Advertisement

अशा स्थितीमध्ये एखाद्या सक्षम राजकिय व्यक्तीने अधिकाऱ्यांच्या बरोबरीने व्यवस्थापनात लक्ष घातले तर सर्व नियोजन सुरळीत होणे शक्य आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्यावर कोल्हापूर जिल्हयाची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना नगरकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती गंभीर होत आहे.

Advertisement

या पार्श्‍वभुमिवर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर सक्षमपणे मात करण्यासाठी जिल्हयात कोरोना नियंत्रण समितीची स्थापना करून त्याचे अध्यक्षपद आमदार नीलेश लंके यांच्याकडे दिल्यास ते सर्व परिस्थती यशस्वीरित्या पार पाडू शकतील असा अम्हाला विश्‍वास आहे.

अशी मागणी शिवसेना उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li