महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात निर्माण झालीये ऑक्सिजन टंचाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-अहमदनगर शहरामध्ये ऑक्सिजन टंचाई सूर आहे त्यापाठोपाठ आता संगमनेरातही ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे.

संगमनेरातील खासगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्समध्ये पुढील काही तांस पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक असून या रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या जवळपास साडेतिनशे रुग्णांचा जीव त्यामुळे टांगणीला लागला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात २१ हजारांच्यावर रुग्ण सध्या उपचार घेत आहे. ऑक्सिजन पातळी कमी असणारे खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढती आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.

नगर शहरात टंचाई निर्माण झाल्यानंतर आता संगमनेर तालुक्यात कमतरता भासत आहे. तालुक्यातील रुग्णांना ऑक्सिजन कमी पडत आहे, यामुळे संगमनेर शहर व तालुक्यातील डॉक्टरांकडून चिंता व्यक्त होत आहे.

ऑक्सिजन लवकर प्राप्त नाही झाला तर रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी चिंता व्यक्त होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांत चिंता निर्माण झाली आहे.

दरम्यान संगमनेरातील रुग्णालयांना लागणार्‍या ऑक्सिजनसाठी महसुलमंत्री बाळासाहेब थोरातही प्रयत्नशील असून उद्यापर्यंत 10 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.

संगमनेर तालुक्यातील विविध खासगी कोविड रुग्णालयांमध्ये आजच्या स्थितीत़ दाखल असलेल्या व ऑक्सिजनची नितांत गरज असलेल्या रुग्णांची एकूण संख्या 344 इतकी आहे.

त्यांना ऑक्सिजनचा अविरत पुरवठा होणं आवश्यक आहे. संगमनेर तालुक्याला दररोज सात मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|