Breaking News Updates Of Ahmednagar

घराबाहेर पडलेली ‘ती’ महिला परतली नाही… आढळून आला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-  प्रवरा नदीच्या पुलावरून उडी मारून शहरातील एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.

त्या महिलेने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट आहे. दरम्यान या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर शहरातील नवीन नगर रोड परिसरात राहणारी रोहिणी काळे (वय 56) ही महिला सकाळी घराच्या बाहेर कचरा टाकण्याच्या निमित्त करून घराच्या बाहेर गेली होती.

दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्रवरा नदी पुलाखाली तिचा मृतदेह आढळून आला . या घटनेबद्दल पोलिसांना माहिती समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली त्यांनी सदर महिलेचा घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.

Advertisement

मात्र तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केला. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणातील पुढील तपास करत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li