१७ हजार शेतकरी झाले थकबाकीमुक्त !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :- कृषिपंप वीज धोरण २०२० च्या अंमलबजावणीमुळे गावागावांमध्ये वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीची ओढ सुरु झाली आहे.

श्रीरामपूर विभागातील १७ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत २१ कोटी २८ लाख रुपयांचा भरणा करून ते थकबाकीमुक्त झाले.

या भरलेल्या वीज बिलाच्या रकमेतून या ग्रामपंचायत क्षेत्रातील कृषी वीजयंत्रणेचे विस्तारीकरण व सक्षमीकरणासाठी रोहित्राची क्षमता वाढ करण्यात येत आहे.

नवीन १०० केव्हीएचे रोहित्र बसवण्यास या भागात सुरवात झाली आहे. कृषिपंप वीजजोडणी धोरण-२०२० अंतर्गत महाकृषी अभियान या योजनेअंतर्गत श्रीरामपूर विभागातील एकूण ६४ हजार ६८१ कृषी पंप ग्राहकांकडे ५४० कोटी रुपये थकबाकी आहे.

यापैकी ३२७ कोटी ५ लाख रुपये रक्कम या योजनेंतर्गत माफ होणार आहे. उर्वरित २१२ कोटी ०५ लाख रुपये कृषीपंप ग्राहकांनी भरावयाची आहे.

श्रीरामपूर विभागातील कृषी बांधवांनी वीज बिल भरण्यास प्रतिसाद दिला. जवळपास १७ हजार ग्राहकांनी २१ कोटी २८ लाख रुपयांचा भरणा केला.

या वसुली झालेल्या रकमेतून ग्रामपंचायत स्तरावर रोहीत्र क्षमता वाढ, नवीन रोहित्र उभारणी, शेती पंप जोडणी सादर कामे करण्यास महावितरणने सुरुवात केली आहे.

राहुरी तालुक्यातील वांबोरी, कात्रस, चेडगाव, बारागाव नांदूर, कुरणवाडी, गुहा, तांभेरे,देवळाली प्रवरा,पाथरे, आरडगाव या गावांमध्ये शेतकऱ्यांनी वीज बिल भरण्यास प्रतिसाद दिला.

त्यानुसार राहुरी तालुक्यात सहा ठिकाणी ६३ केव्हीए ऐवजी १०० केव्हीए व ८ नवीन रोहित्रांचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आहे.

त्यापैकी वांबोरी कक्षातील दोन ठिकाणी ६३ केव्हीए रोहित्राच्या जागी १०० केव्हीए रोहित्राची क्षमता वाढ करण्यात आलेली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|