Breaking News Updates Of Ahmednagar

दिलासादायक ! अखेर संगमनेरात ऑक्सिजनचे दोन टँकर दाखल

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती दिसून येत आहे.

यातच कोरोना बाधितांच्या वाढत्या आकडेवारीमुळे याची मागणी जास्त वाढली आहे. मात्र एक दिलासादायक माहिती समोर येत आहे.

Advertisement

संगमनेरात ऑक्सिजन टंचाई गंभीर परिस्थिती निर्माण होण्याअगोदरच दोन ऑक्सिजनचे टँकर चाकण येथून दाखल झाल्याने कोरोना रुग्ण व नातेवाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संगमनेरात ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली होती. काही तास पुरेल इतकाच साठा शिल्लक होता. या सर्व परिस्थितीवर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात होते.

Advertisement

संगमनेरातील रुग्णालयांना लवकरात लवकर ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्नशील होते. तर ऑक्सिजनचे टँकर संगमनेरात दाखल झाल्याने मोठा दिलासा तालुक्याला मिळाला आहे.

सध्या तरी इंजेक्शनचा तुटवडा नसल्याने संगमनेरातील आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढण्यास यशस्वी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Advertisement

संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत २१७ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यात सध्या १६९९ अॅक्टिव रुग्ण आहेत. तर आज २७६ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li