Breaking News Updates Of Ahmednagar

कोरोनाची परिस्थिती पाहता मंत्री गडाखांनी दिला महत्वपूर्ण आदेश

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शिंगणापूर ग्रामीण रुग्णालयात प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

शिंगणापुरात तत्काळ १०० बेड्सचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यात यावे असे आदेश जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी प्रशासनाला दिले आहे.यामध्ये ४० ऑक्सिजन बेड्स, ८ आयसीयू बेड्सची सुविधा असणार आहे.

Advertisement

शिंगणापूर येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरला गडाख यांनी भेट देऊन कोरोना रुग्णांशी संवाद साधला. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांना देण्यात येणाऱ्या जेवण व इतर सोयी-सुविधा, औषधोपचार आदींबाबत माहिती घेतली.

दरम्यान कोरोना रुग्णांसाठी सुरु करण्यात येणारे हे हॉस्पिटल शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली सेवा देणार असून, त्यासाठी औषध पुरवठा करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक पोखरणा

Advertisement

यांना त्याचप्रमाणे ऑक्सिजन पुरवठ्याबाबत प्रांत व तहसीलदार यांना गडाख यांनी सूचना केल्या. तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांना सूचना देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असलेल्या ठिकाणी तत्काळ जाहिरात देऊन भरती करण्यास सांगितले.

तालुक्यातील आरोग्य यंत्रणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढवून जास्तीत जास्त लसीकरण मोहीम राबवावी, अशाही सूचना त्यांनी केल्या.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li