Breaking News Updates Of Ahmednagar

अजितदादा म्हणतात, या कानाने ऐकेन आणि या कानाने सोडून देईन,

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-माझ्या नेत्याने सांगितलं तर मी ऐकेन. आमच्या महाविकासआघाडीने सांगितलं तर मी ऐकेन. कुणीतरी फारच विचारपूर्वक सल्ला दिला तर मी ऐकेन.

पण सल्ला देताना त्याचा हेतू काही वेगळा असेल, तर कशाला मी ऐकेन? तुम्ही सगळे मला ओळखता. मला कुणीतरी काहीतरी सांगावं आणि त्यांचं मी ऐकावं असं नाहीये.

Advertisement

या कानाने ऐकेन आणि या कानाने सोडून देईन, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना कोपरखळी मारली.

अजित पवार यांनी एकतर राजधानी पुण्यात हलवून इथून कामकाज करावं किंवा पुण्याचे पालकमंत्री तरी बदलावेत, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

Advertisement

त्याला अजितदादांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी अजित पवार यांनी पंढरपुरात निवडणुकांनंतर वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येवर देखील भूमिका मांडली.

निवडणूक आयोगाने निवडणूक लावल्यामुळे पंढरपुरात निवडणुका झाल्या. राज्य सरकारच्या हातात ज्या निवडणुका होत्या, त्या आपण पुढे ढकलल्या.

Advertisement

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तमिळनाडूमध्ये निवडणुका लागल्यानंतर सगळे तिकडे प्रचार करतच होते ना? कुंभमेळ्यामध्ये लोकं आंघोळी करत होते,

दर्शन घेतच होते, स्नान करतच होते. याला नागरिकच जबाबदार आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुका लावल्या म्हणून त्यांना जबाबदार धरणार का?, असं ते म्हणाले.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li