खातेदारांनो लक्ष द्या; जिल्हा बँकेच्या कामकाजाच्या वेळेत बदल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-शात विशेष करून राज्यामध्ये कोविडची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर आली आहे. शासनानेही कडक स्वरूपात लॉकडाऊन जाहीर केले आहे.

तसेच जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कामकाज वेळेत बदल केला असून, येत्या ३० एप्रिलपर्यंत सर्व शाखा सकाळी १०.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे,

अशी माहिती बँकेचे अध्यक्ष उदय शेळके व उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी दिली. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८५० ते ९०० विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांमार्फत खरीप पिकांसाठीचे कर्ज वितरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेला दिलेल्या पीक कर्जाची उद्दिष्टप्रमाणे बँक कर्ज वाटप करणारच आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना व भगिनींना तसेच बँकेच्या इतर सर्व ग्राहकांनी कोरोनापासून स्वत:च संरक्षण करावे.

शाखांमध्ये गर्दी न करता सर्वांनी एकमेकाच्या सहकार्याने कामकाज चालवण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी केले आहे.

बँकेचे जवळपास १६० कर्मचारी हे कोविड पॉझिटिव्ह निघाले आहे. ८ कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. त्याच प्रमाणे ३० कंत्राटी कर्मचारी ही पॉझिटिव्ह आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|