Breaking News Updates Of Ahmednagar

महसूलमंत्री म्हणाले…घटनेचे कारण लवकरच समोर येईल

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- मुंबई जवळील विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागात भीषण आग लागून 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

याप्रकरणावर महसूलमंत्र्यांनी आपली प्रतिक्रया दिली आहे. यावेळी बोलताना मंत्री थोरात म्हणाले कि, अशा प्रकारच्या घटना इतर ठिकाणी घडू नये,

Advertisement

याबाबत पुन्हा सूचना दिल्या जातील. रुग्णालयातील घटनेच्या फायर ऑडिट संदर्भात मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमण्याचे जाहीर केलेले आहे.

विरारच्या घटनेतील कारण चौकशी समितीतून समोर येईल. दरम्यान जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कोरोना युद्धामध्ये दिवस-रात्र लढत आहे. जिल्हा प्रशासन सतर्क असून पूर्ण क्षमतेने काम करत आहे.

Advertisement

प्रशासनावर या काळात प्रचंड ताण असला तरी भविष्यात अशा दुर्घटना घडणार नाहीत याची काळजी जिल्हा प्रशासन घेईल, असे महसूलमंत्री थोरात यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li