चर्चा तर होणारच : कमी खर्चात अहमदनगर जिल्ह्यातील ह्या डॉक्टरने बरे केले तब्बल ३७०० काेरोना रुग्ण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-जामखेडच्या जुलिया हॉस्पिटलमध्ये डॉ. रवी आरोळे हे कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करतात. डॉ. आरोळे यांनी रेमडेसिवीर या महागड्या औषधाचा कमीत कमी वापर केला आहे.

त्यांनी आयसीएमआरने सांगितलेल्या औषधांचा वापर करुन आतापर्यंत 3700 रुग्णांना बरं केले. या सेंटरचा मृत्युदर हा केवळ 0.64 % इतका आहे. कमी खर्चात उपचार करणाऱ्या जुलिया हॉस्पिटलची दखल आमदार रोहित पवारांनीही घेतली आहे.

त्याबाबत माहिती देणारे ट्विट त्यांनी केले आहे. जामखेडमध्ये आरोळे हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी एक स्वतंत्र उपचार पद्धती यशस्वीपणे राबवत असल्याचं आमदार पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

या हॉस्पिटलचे वैशिष्ट्य म्हणजे या हॉस्पिटलमध्ये रूग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष, उपचार प्रणालीचा उपयोग केला जातो. एकीकडे राज्यात रेमडेसिवीर औषधाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

त्यामुळे या औषधाचा तुटवडादेखील निर्माण झाला आहे. मात्र या हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णांना दिले जात नाही. येथे रुग्णांवर उपचार करण्यासाठी ICMR मान्यताप्राप्त औषध आणि ऑक्सिजनचा पुरवठा कोरोनाबाधित रुग्णांना दिला जातो.

विशेष म्हणजे यामुळे रुग्ण लवकर बरे होतात. डॉ. आरोळे यांनी वापरलेल्या उपचारप्रणालीचे केंद्राच्या पथकानेही कौतुक केले आहे. तसेच अशी उपचारप्रणाली सर्वत्र वापरावी, असे पत्र डॉ. आरोळे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठवले आहे.

या उपचारामुळे अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. त्यामुळे रुग्णांनीदेखील याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. या हॉस्पिटलमध्ये दिले जाणारी औषधी अत्यंत स्वस्त आहेत.

तसेच येथे कोणतेही महागडे उपचार घेण्याची गरज रुग्णांना पडत नाही. डॉ. आरोळे यांच्या उपचारामुळे मोठ्या प्रमाणात फरक पडत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाच्यास संकटकाळात मोठा दिलासा मिळत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|