Breaking News Updates Of Ahmednagar

विहिरीत पडून तरूणीचा मृत्यू; चार तासानंतर मृतदेह विहिरीबाहेर काढला

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- एका शेतकरी कुटूंबातील तरूणीचा विहीरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे घडली आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, भोकर शिवारातील वडजाई परीसरात शेतात राहत असलेले संदिप सावळेराम जगदाळे यांची मुलगी पुजा संदिप जगदाळे (वय 16) ही महाविद्यालयीन तरूणी विहीरीत पडल्याने तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Advertisement

ही घटना समजताच कुटुंबीयांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र निषफळ ठरला. अखेर चार तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह विहीरीतून बाहेर काढण्यास यश आले.

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीसांत येथील मच्छींद्र कारभारी जाधव यांनी खबर दिली. या प्रकरणी तालुका पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li