राहुरी मतदार संघात 5 कोटींच्या विकास कामांना मंजुरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :- राहुरी विधानसभा मतदारसंघात ५ कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग अंतर्गत राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील मूलभूत सुविधेसाठी ५ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती नामदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडून देण्यात आली आहे.

यामध्ये रस्ता डांबरीकरण सभामंडप, स्मशानभूमी सुशोभीकरण, ब्लॉक बसवणे, आदींचा विकास कामांचा सहभाग आहे. बारागाव नांदूर रस्त्या डांबरीकरणासाठी ५० लाख रुपये, कात्रड वांबोरी शिव रस्ता डांबरीकरणासाठी ३५ लाख रुपये,

सोनगाव सात्रळ चौक ते धानोरी घाट रस्ता डांबरीकरणासाठी २० रुपये, तांदुळवाडी गावठाण ते आयटीआय जुना रस्ता डांबरीकरणासाठी ३५ लाख रुपये,नगर तालुक्यातील वडारवाडी वेश कॉलनी रस्ता काँक्रीटकरण्यासाठी 20 लाख रुपये,

तांभेरे मराठी शाळा ते चिंचोली फाटा रस्ता डांबरीकरणासाठी २५ लाख रुपये, कोंढवड ते जुना पिंपरी अवघड रस्ता खडीकरणासाठी १५ लाख रूपये, बारागाव नांदूर ते मल्हारवाडी शिव रस्ता खडीकरणासाठी ३५ लाख रुपये,

बारागाव नांदूर जांभळी डिग्रस नर्सरी नदीवरील रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी २५ लाख रुपये, बारागाव नांदूर ते बोरटेक बन रस्ता मजबूतीकरण डांबरीकरणासाठी ३० लाख रुपये, बारागाव नांदूर गावठाण हनुमान मंदिर प्लेव्हिंग बाॅल्क बसविण्यासाठी ५ लाख रुपये,

कनगर दिवे वस्तीवरील समाज समाज मंदिर बांधकामासाठी २५ लाख रुपये, डिग्रस ते नगर-मनमाड रोड ते ज्ञानगंगा हायस्कूल रस्ता खडीकरणासाठी १० लाख रुपये, देसवंडी ते पवार वस्ती ते गीते वस्ती मजबुतीकरण डांबरीकरणासाठी २५ लाख रुपये,

शिलेगाव गावठाण ते करपरावाडी रस्ता मजबूतीकरण डांबरीकरणासाठी ४० लाख रुपये,म्हैसगाव केदारेश्वर ते किटीवेअर रस्ते करणे ३ लाख रुपये,शिराळे तालुका पाथर्डी मुळे वस्ती ते कडगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २५ लाख रुपये,

शिराळा तालुका पाथर्डी तुपे वस्ती रस्ता खडीकरणासाठी १० लाख रुपये,कनगर ता.राहुरी जुना कनगर रस्ता ते वडाचे लवन रस्ता डांबरीकरणासाठी २५ लाख रुपये ,वावरत ता. राहुरी खिलारवाडी येथे सभामंडप बांधण्यासाठी १२ लाख रुपये,,

वावरथ येथील कळवण वाडी रस्ता मजबुतीकरण डांबरीकरणासाठी २५ लाख रुपये,कनगर ता.राहुरी येथील मुस्लिम कब्रस्थान स्मशानभूमीसाठी ५ लाख रुपये आदींसाठी हा निधी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती नामदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडून देण्यात आली आहे

मतदारसंघात अजून काही कामे प्रस्तावित आहेत परंतु कोरोणा महामारीमुळे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे लवकरच कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर सदरचे काम अनुक्रमाने सुरू होणार असल्याची माहिती तनपुरे यांच्याकडून देण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|