Breaking News Updates Of Ahmednagar

खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि 10 हजार इंजेक्शन आणल्या दावा हे संपूर्णपणे संशयास्पद !

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-  खासदार सुजय विखेंचा व्हिडीओ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून 10 हजार इंजेक्शन आणल्याचा दावा संपूर्णपणे संशयास्पद आहे. एकीकडे नगर जिल्ह्यातील नागरिक इंजेक्शनसाठी मदतीची याचना करत असताना असे व्हिडीओ नागरिकांची थट्टा करणारे आहेत.

एकतर सुजय विखेंनी त्या बॉक्समध्ये काय होत ते स्पष्ट येई करावं, आणि जर रेमडेसीविर असतील तर ते कुणाला वाटले किंवा सामान्य जनतेला ते कुठं मिळतील ? याची माहिती द्यावी, असे आवाहन राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

Advertisement

दोन दिवसांपूर्वी खासदार डॉ सुजय विखे यांनी दिल्लीहून रेमडेसीविर इंजेक्शन बॉक्स हवाइमार्गाने आपल्यासोबत महाराष्ट्रात आणले होते. त्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

दरम्यान, या इंजेक्शनमुळे नगरची ओरड कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, खासदार विखे यांनी 10 हजार इंजेक्शन आणल्याचे कार्यकर्ते सांगत असताना सर्वसामान्य जनतेला मात्र इंजेक्शन मिळत नसल्याने त्यांची वणवण सुरूच आहे.

Advertisement

या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुजय विखेंच्या व्हिडीओबाबत त्यांनी संशय व्यक्त करतानाच विखेंनी बॉक्समध्ये काय होत, ते सांगावे जर इंजेक्शन असेल तर ते नेमकं कुणाला वाटलं किंवा जनतेला ते कुठं भेटेल, याची माहिती द्यावी, असेही आवाहन केले आहे.

दरम्यान, खा विखे यांनी खरचं इंजेक्शन आणले असतील तर ते रुग्णांना का दिले जात नाही, इंजेक्शन नेमके कुठं मिळणार आहेत, त्याची किंमत काय असेल, की विखेनी ते इंजेक्शन फकत त्यांच्या संस्थेतील रुग्णांसाठीच आणले का ?

Advertisement

असे अनेक सवाल या निमित्ताने जनतेमधून पुढे येत आहे. नक्कीच खासदार विखे पाटील हे इंजेक्शन कुठं मिळतील सांगतील, त्याच्या वाटपाचे देखील उत्तम नियोजन करतील, अशी अपेक्षा असल्याचे चाकणकर यांनी म्हंटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li