आगडगावच्या भैरवनाथांची रविवारी होणारी यात्रा रद्द

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-नगर तालुक्‍यातील आगडगाव येथील काळ भैरवनाथांची रविवारी असलेली यात्रा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ती रद्द करण्यात आली आहे.

त्यामुळे भाविकांनी घरीच राहून पूजा करावी, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. मागील वर्षीही कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांची कुचंबना झाली.

या वर्षी मात्र कोरोनाने अधिक भयंकर रुप घेतल्याने दर्शनव्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरगावच्या भाविकांनी गावात येऊ नये. दरम्यान, आगडगाव येथे सुरू करण्यात आलेल्या कोरोना विलगीकरण केंद्रास देवस्थानच्यावतीने मदत दिली जात आहे.

निवास, भोजन तसेच इतर सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत. देवस्थानची रुग्णवाहिकाही मोफत सेवा करीत आहे. गरजू रुग्णांना चोवीस तास सेवा देण्याचे महत्त्वाचे काम करीत असल्याने पंचक्रोशितील गावांमध्ये चांगली सुविधा झाली आहे.

या सर्व सुविधांसाठी भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने मदत द्यावी, असे आवाहन ट्रस्टच्या विश्‍वस्तांच्या कॉन्फरन्सीद्वारे झालेल्या बैठकित करण्यात आले.

देवस्थानच्या www.bhairavnathtrust.org या अधिकृत वेबसाईटवरून “ऑनलाईन डोनेशन’द्वारे मदत स्विकारली जाते.

गेल्या दीड वर्षांपासून देवस्थानच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. मागील वर्षीही कोरोनाग्रस्थांना अन्नदान, किराणा आदी वाटप करण्यात आले. या वर्षीही मदत करण्यात येत असल्याने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|