जिल्हा रुग्णालयात लसीकरणावेळी सोशल डीस्टन्सिगचा फज्जा ; शिवसेनेचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविड लसीकरण मोहीम सुरु आहे. त्यात सोशल डिस्टंसीगचा पुरता फज्जा उडाला आहे.

त्यामुळे जिल्हा रुग्णालयातच कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे या ठिकाणी टाकण्यात आलेला मंडप अपुरा आहे. तेव्हा त्या मंडपाचा आकार वाढविण्यात यावा तसेच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी.

अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे माजी नगरसेवक विक्रम राठोड यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना दिले आहे. या निवदेनात म्हंटले आहे की,

नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातच कोरोनाग्रस्त असलेले ६०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. आणि रुग्णालयाच्या प्रवेश द्वारावरच कोरोना प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मात्र ती लस देत असताना तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तेथे सोशल डिस्टंसीग च्या नियमांचे कोणतेच पालन होतांना दिसत नाही तसेच लस घेण्यासाठी आलेले आबाल वृद्ध तसेच महिला मोठ्या संख्येने तेथे येतात .

सकाळी १० वाजल्यापासून येथे लसीकरणासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात . सध्या एप्रिल मे च्या महिन्यात नगरमध्ये तापमानाचा पारा ३५ – ३६ अंश सेल्सियसच्या पुढे जात असतो .

ऐन उन्हाळ्यात ही लसीकरण मोहीम सुरु आहे . या ठिकाणी लोकांना सावली मिळावी म्हणून तेथे जो मंडप उभारण्यात आला आहे. तो अतिशय तोकडा आहे. तेथे लस घेण्यासाठी आलेल्या बऱ्याच जणांना उन्हाचा त्रास सहन झाला नाही आणि ते तिथेच चक्कर येऊन पडले.

अनेकांना घरी आल्यानंतर त्रास झाला. लसीच्या साईड इफेक्ट बरोबर उष्णतेमुळे बरेच जण आजारी पडले . येत्या एक मे पासून १८ वर्षावरील सर्वांना सरसकट लसीकरण करण्यात येणार आहे.

त्यामुळे येथील गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे . नगर मध्ये कोरोनाचा कहर दिवसेदिवस वाढत असताना या ठिकाणच्या गर्दीमुळे सुरक्षित अंतर पाळले गेले नाही तर तेथूनच कोरोणाचा फैलाव वाढण्याची भीती आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|