Breaking News Updates Of Ahmednagar

‘या’ तालुक्यात एचआरसीटी चाचणी करण्यासाठी रुग्णांची केली जातेय लूट!

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यात कोरोना बाधित रूग्णाच्या एचआरसीटी चाचणी करण्यासाठी रुग्णांकडुन नियमापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याची तक्रार येथील नगरसेवक प्रविण राजगुरु यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

पाथर्डीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सांगुनही कारवाई होत नाही.  येथील ग्लोबल डायग्नोस्टिक सिटी स्कॅन सेंटरवर छापा टाकून कारवाई करावी. अन्यथा मी जनतेसाठी या परस्थीतीही अंदोलनाचा मार्ग स्वीकारील असा इशारा राजगुरु यांनी दिला आहे.

Advertisement

याबाबत मुख्यामंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांतअधिकारी, तहसिलदार व तालुका आरोग्यअधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांना प्रविण राजगुरु यांनी येथील ग्लोबल डायग्नोस्टिक सिटी स्कॅन सेंटर बाबत गंभीर तक्रारी केल्या आहेत.

येथे रुग्णांकडुन अडीच हजार तपासणी फी घेणे बंधनकारक आहे. मात्र अहमदनगर महापालिका क्षेत्राप्रमाणे चार हजार रुपयाची आकारणी केली जाते, अशी तक्रार पुराव्यानिशी राजगुरु यांनी केली आहे.

Advertisement

पाथर्डीतील आरोग्य विभागाचे काही अधिकारी तक्रार केल्यानंतर या सेंटरवर जाऊन आले मात्र त्यांनी केवळ रुग्णांची बसण्याची व्यवस्था करा व सोशल डिस्टंन्स पाळा अशा सुचना केल्या असा दावा राजगुरु यांनी केला आहे.

त्यामुळे  या प्रकरणाची चौकशी करावी. नियमाप्रमाणे अडीच हजार रुपये फी आकारावी येथे चार ते पाच हजार रुपये घेतले जातात. ज्या रुग्णांकडुन नियमापेक्षा जास्त फी घेतली आहे त्यांना ती परत द्यावी.

Advertisement

कारवाी होत नाही तोपर्यंत माघार नसल्यचे राजगुरू यांनी सांगितले तर सुरवातीच्या काळात आम्ही नगरप्रमाणे फी आकारणी केली होती. मात्र एक महिन्याभरापासुन आम्ही अडीच हजार फी घेत आहोत.राजगुरु यांनी आमच्याकडे काही पेशंट पाठविले होते.

त्यावरुन त्यांनी वाद घातला आहे. पेशंट आम्ही मध्येच घेवु शकत नाहीत. सकाळी सात वाजल्यापासुन पेशंट येथे उभे राहतात. नंबर प्रमाणे पेशंट तापासले जातात व नियमाप्रमाणे फी आकारतो अशी माहिती या सिटी स्कॅन सेंटरचे तंत्रज्ञ अजय केदार यांनी दिली.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li