अमरधामच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दरदिवशी हजारोंच्या संख्येने बाधितांची भर घालत आहे. यातच मृत्यू देखील वाढल्याने शहरातील नालेगाव अमरधामवरील ताण वाढला आहे.

महापालिकेच्या नालेगाव अमरधाममध्ये करोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. यामुळे या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांचा मोठा वावर वाढू लागला आहे.

कधीकधी अंत्यविधीवरून या ठिकाणी काहीसे वादजन्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

यामुळे आता अमरधामच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान नुकतेच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार नालेगावमधील अमरधामचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे.

त्याऐवजी कल्याण रोडकडील छोटे प्रवेशद्वार खुले करण्यात आले असून त्यातून करोना बाधित मृताचे केवळ दोन नातेवाईक व शववाहिकालाच अमरधाममध्ये प्रवेश दिला जात आहे.

नालेगाव अमरधाममध्ये मोठ्या संख्येने करोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. यामुळे येथील कर्मचार्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

करोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मृत रूग्णाच्या केवळ दोन नातेवाईकांनाच आत प्रवेश दिला जातो. मात्र काही नातेवाईक अरेरावी करत मोठ्या संख्येने आत येत आहेत.

त्यामुळे शहरात करोना पसरण्याचा धोका आहे. नातेवाईकांनी गर्दी केल्यास अंत्यसंस्कार करतानाही अडचणी येत आहे. बाधित मृतांच्या नातेवाईक व कुटुंबियांची वाढती गर्दी लक्षात घेता महापालिकेने पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्ताची मागणी केली होती.

मात्र पुरेसा बंदोबस्त मिळत नसल्याने अमरधामच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|