सकारात्मक बातमी : नगर जिल्ह्यात 1 लाख 37 हजार जणांनी कोरोनाला केले पराभूत.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३१९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार ६८६ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.८० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८६६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ८४० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १६०८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६४२ आणि अँटीजेन चाचणीत ६१६ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८८, अकोले २४१, जामखेड ९१, कर्जत १०५, कोपरगाव ३०, नगर ग्रामीण ७३, नेवासा ४०, पारनेर ९२, पाथर्डी ९७, राहता ३८, राहुरी २८, संगमनेर २२४, शेवगाव २१८, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर ५१, कॅंटोन्मेंट बोर्ड ४९, मिलिटरी हॉस्पिटल १२ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३२, अकोले २२, कर्जत ०६, कोपरगाव ०८, नगर ग्रामीण ३३, नेवासा १०, पारनेर ०५, पाथर्डी ०३, राहाता ८१, राहुरी ०८, संगमनेर १६२, श्रीगोंदा ०८, श्रीरामपूर २५, कॅंटोन्मेंट बोर्ड २३ आणि इतर जिल्हा १५ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ६१६ जण बाधित आढळुन आले. मनपा ४९, अकोले १४, जामखेड ०९, कर्जत ७२, कोपरगाव ३४, नगर ग्रामीण ५१, नेवासा ७४, पारनेर २९, पाथर्डी २६, राहाता ४०, राहुरी ८४, संगमनेर ०६, शेवगाव १६ श्रीगोंदा ८१, श्रीरामपूर २५ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ७२६, अकोले १९९, जामखेड ४५, कर्जत २१२, कोपरगाव १८२, नगर ग्रामीण २५५, नेवासा ११०, पारनेर १३४, पाथर्डी ८९, राहाता २०४, राहुरी १०३, संगमनेर २९५, शेवगाव २११, श्रीगोंदा १२०, श्रीरामपूर ११२, कॅन्टोन्मेंट १२६, मिलिटरी हॉस्पिटल २३ आणि इतर जिल्हा ४९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:१,३७,६८६
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२२८४०
  • मृत्यू:१८४९
  • एकूण रूग्ण संख्या:१,६२,३७५
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|