मनपाच्या फ्रंटलाईन वर्करसाठी ‘ते’ इंजेक्शन राखीव ठेवा!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :- महापालिकेचे काही कर्मचारी सध्या शहरातील हॉस्पिटलमध्ये गंभीर परिस्थितीत असल्याने या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या मागणीप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

त्यांनी आपल्यासह जिल्हाधिकारी, तहसिलदार, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष तसेच मनपा आरोग्याधिकारी यांना सतत संपर्क केलेला आहे.

परंतु काळाबाजार अथवा इंजेक्शन्सचा पुरेसा पुरवठा न होण्याच्या कारणामुळे आपण हतबल असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मनपाचे कर्मचारी जीवावर उदार होऊन जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत. त्यांना जर इंजेक्शन मिळत नसतील तर ही निषेधार्ह बाब आहे.

तेव्हा सदरची इंजेक्शन मनपा कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्याची मागणी माजी नगरसेवक भैरवनाथ वाकळे व कॉ. मेहबूब सय्यद यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

ते पुढे म्हणाले की, खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी थेट दिल्लीवरून इंजेक्शन्स आणलेले आहेत. त्यापैकी काही इंजेक्शन्स आपल्या महापालिकेच्या कोरोनायोध्दे असलेल्या

फ्रंन्टलाईन वर्कर्ससाठी आपण स्वत: खासदारांना पत्रव्यवहार करून अथवा तातडीचा फोन करून मागणी करावी व हे इंजेक्शन्स मिळवावेत. मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही गोष्ट अत्यंत गरजेची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|