Breaking News Updates Of Ahmednagar

जिल्ह्यात दररोज ६ हजार रेमडेसिवीर इंजेकशनची आवश्यकता भेटतात फक्त बाराशे !

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात सध्या दररोज ६ हजार रेमडेसिवीर इंजेकशनची आवश्यकता असून केवळ हजारे ते बाराशेपर्यत इंजेक्शनची उपलब्धता होत आहे.

तेव्हा तातडीने जिल्ह्याला आवश्यक असलेली इंजेक्शनचा साठा पुरविण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Advertisement

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.१३ एप्रिल रोजीच्या आकड्यानुसार आमच्या जिल्ह्याची रुग्णसंख्या १३ हजार १०७ होती पण आज दि.२५ एप्रिल नुसार बाधित रुग्णसंख्या २४ हजारच्या पुढं गेलेली आहे आणि शिवाय रोज आकडा झपाट्याने वाढत आहे.

आमच्या जिल्ह्याचा मृत्यूदरही वाढत आहे. तेव्हा आमच्या जिल्ह्याकडे लक्ष देण्यात यावे. आजची नवीन वाढ ४ हजारवर येऊन ठेपली आहे आणि सगळ्यात जास्त रुग्ण वाढ नगर जिल्ह्यात आहे. शिवाय ऑक्सिजन पुरवठा देखील अत्यंत अल्प आहे.

Advertisement

नगरच्या प्रशासनाने इंजेक्शन पुरवण्यासाठी उपजिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून त्याचे नियोजन म्हणावे असे होताना दिसत नाही. जिल्हाधिकाऱ्यांपर्यत नागरिक तक्रारी करीत असतात,

त्यामुळे वितरण जलद गतीने कशा प्रकारे होईल यासाठी संबंधितांना त्वरीत आपल्या पातळीवरून आदेश व्हावेत.

Advertisement

सध्या नगर जिल्ह्यात रोजची रेमेडीसीवीरची आवश्यकता ६ हजार असून आम्हाला फक्त १ हजार ते बाराशेचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे.

सगळीकडे वातावरण गंभीर असून कधी काय होईल याचा भरवसा नाही. हॉस्पिटलसुद्धा रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत आहे. तरी या सर्व विषयांवर लवकरात लवकर लक्ष द्यावे, असे श्री. कदम यांनी म्हटले आहे.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li