त्या बॉक्‍समध्ये काय होते, ते मोकळे होते की त्यामध्ये बिस्किट, चॉकलेट होते, हे मी त्यांना सांगेन …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ. विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत थेट विशेष विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला.

या साठ्याचे वाटप केल्याबद्दल माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला. तो रेमडेसिवीरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले नाही.

या साठ्यातील इंजेक्शन त्यांनी सरकारी दवाखान्याला वाटप केले आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिल्लीहून आणलेल्या बॉक्समध्ये नेमके काय होते? त्यांनी ही इंजेक्सन्स खरंच आणली असतील

तर ती कोठे आणि कोणाला वाटली हे जाहीर करावे,’ अशी मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना डॉ. विखे यांनी उत्तर दिले आहे. त्यांचे नाव न घेता डॉ. विखे म्हणाले की, ‘माझी बांधिलकी नगर जिल्ह्याशी आहे.

येथील लोकांना उत्तर देण्याची माझी जबाबदारी आहे. जिल्ह्याबाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला मी याचे उत्तर देणे लागत नाही असे स्पष्टीकरण डॉ विखे यांनी दिले आहे. दरम्यान ह्या प्रकरणा बाबत बोलताना सो सुजय विखे म्हणाले “आम्ही फसवेगिरी केली असती,

तर जिल्ह्याने पन्नास वर्षे आम्हाला साथ दिली नसती. “रेमडेसिव्हिर’बाबत राजकारण चालू आहे. मी व्हिडिओमध्ये दाखविलेल्या बाॅक्समध्ये काय आहे, हे जिल्ह्याबाहेरील लोकांना सांगण्याची गरज नाही.

खासदार विखे पाटील यांनी कर्जत तालुक्‍यातील मिरजगाव, माहिजळगाव, कर्जत शहर आणि राशीन येथे भेट देत कोरोना संसर्गाबाबत आढावा घेतला. तसेच याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. या वेळी बोलताना त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

खा.डॉ सुजय विखे म्हणाले की माझा व्हिडिओ व्यवस्थित पहिला, तर मी त्यामध्ये किती इंजेक्‍शन्स आणले, याबाबत उल्लेख नाही. मी कुठे गेलो होतो, काय केले, याबाबत कुणीही टिप्पणी करू नये.

त्या बॉक्‍समध्ये काय आहे, याबाबत ज्यांना शंका आहे, त्यांनी अधिकृतपणे बोलावे. मी त्यांना व्यक्तिशः उत्तर देईल. माझी बांधिलकी नगर जिल्ह्यापुरती आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना त्या बॉक्‍समध्ये काय होते,

ते मोकळे होते की त्यामध्ये बिस्किट, चॉकलेट होते, हे मी त्यांना सांगेन. जिल्ह्याच्या बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला उत्तर देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्लीहून रेमडेसिवीर औषध आणल्याप्रकरणाची चौकशी करून

कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका नगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. अनेक निर्बंध असतानाही सुजय विखे यांनी हे औषध कोठून आणले,

कोठे वितरित केले याची चौकशी करून हे काम बेकायदेशीररित्या झाल्याचे आढळून आल्यास साठा जप्त करून कारवाई व्हावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|