Breaking News Updates Of Ahmednagar

टाळेबंदीतही पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक जोमात

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :- टाळेबंदीत देखील पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असून, वाळू वाहतूक करणार्‍या विना क्रमांकाच्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक आर्थिक हितसंबंध असल्याने जाणीवपुर्वक कारवाई करीत नसल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

तर या प्रकरणी उपलब्ध असलेल्या सीसीटिव्ही फुटेजची पहाणी करुन संबंधीत वाहन निरीक्षकाची चौकशी करुन कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे.

Advertisement

पारनेर तालुक्यात अवैध वाळू व्यवसाय करणारे शंभर पेक्षाही जास्त वाहतूक करणारे वाहनांचे सीसीटीवी फुटेज उपलब्ध आहे.

मात्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटर वाहन निरीक्षक यांनी अवैध वाळू व्यवसायिकांशी अर्थपूर्ण संबंध ठेवून जाणीवपूर्वक फक्त पाच वाहनांवर कारवाई दाखवली आहे.

Advertisement

ही कारवाई देखील माहिती अधिकारातून उघड झाली आहे. अशा अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळे अवैध धंद्यांना पाठबळ मिळत असून, सदरच्या परिसरात वाळू तस्करांची दहशत निर्माण झाली असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

पारनेर तालुक्यात दिवस, रात्र वाळू वाहतूक सर्रास सुरु आहे. अर्थपूर्ण संबंध ठेवून फक्त पाच वाहनांवर कारवाई करुन इतर वाहनांना सुट देण्यात आली आहे. दिशाभूल करणारा अहवाल दाखवून शासनाची फसवणूक केली जात आहे.

Advertisement

यामुळे सरकारचा मोठा महसुल बुडत आहे. शंभरपेक्षा जास्त वाहनांची सुरु असलेल्या वाहतुकीचे चित्रीकरण सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे.

हा पुरावा म्हणून सीसीटिव्ही फुटेज तपासूण संबंधीत वाहन निरीक्षकाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

टाळेबंदीत सर्व उद्योग, व्यवसाय बंद असताना अवैध वाळू वाहतूकीला काही अधिकारी अभय देत आहे.

यामुळे वाळू तस्करांची दहशत वाढली असून, आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी अधिकारी डोळेझाक करीत आहे. -अरुण रोडे (जिल्हाध्यक्ष, अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती)

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li