भारताच्या मदतीसाठी या दिग्गज कंपनीने हात सरसावले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातील रुग्णांची आणि मृत्युंची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. भारताला जगभरातून मदतीचा पुरवठा सुरु झाला आहे.

यातच भारतातील कॉर्पोरेट्सपैकी टाटा, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स यांसारख्या कंपन्यांनीही सरकारला आणि प्रत्यक्ष जनतेला वेगवेगळ्या रूपांत मदत सुरू केली आहे.

नुकतेच गुगल आयटी कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कोरोना कार्यासाठी मदत निधी म्हणून 135 कोटी रुपये मदत भारताला देणार असल्याची घोषणा केली.

त्यानंतर ॲपल या अमेरिकी स्मार्टफोन उत्पादक कंपनीचे सीईओ टीम कूक यांनीही आज भारतातील कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील कोरोना योद्ध्यांसाठी आर्थिक मदत करण्याचा कंपनी विचार करत असल्याचे सांगितले आहे.

पण कूक यांनी कंपनी किती रक्कम देणार आहे हे मात्र जाहीर केलेले नाही. आपल्या ट्विटमध्ये ॲपलचे सीईओ टीम कूक यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे भारतात उद्भवलेल्या भयावह परिस्थितीत जे कोरोना महामारीविरुद्ध लढत आहेत,

ते कोरोना योद्धे, वैद्यकीय क्षेत्रातील सर्वजण आणि आमच्या कंपनीतील भारतीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही वैचारिकदृष्ट्या ठामपणे उभे आहोत. भारतातील मदत कार्यासाठी लवकरच ॲपल आर्थिक मदत देईल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|