Breaking News Updates Of Ahmednagar

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भाजीविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असतानाही पारनेरमधील मुख्य बाजारपेठ असणार्‍या गावात भाजीपाला व फळ विक्रेत्यांची दररोज मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.

त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे व पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी बुधवारी संयुक्त कारवाई करत गर्दी करणार्‍या भाजीपाला व फळ विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Advertisement

पारनेर शहरासह भाळवणी आणि टाकळी ढोकेश्वर येथील बाजारतळावर भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या 40 भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

तहसीलदार व पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली असून भाजीपाला विक्रेत्यांचे वजन काटे जप्त करण्यात आले आहेत.

Advertisement

तहसीलदार ज्योती देवरे यांनी पुढील पाच दिवसांसाठी पारनेर तालुका कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन केले असून फक्त आरोग्य सेवा चालू राहणार असल्याचेही ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सांगितले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li