Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग – वखार महामंडळाच्या गोडाऊनला आग; कोट्यवधींचे नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनला मंगळवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोडाऊन मधील कापूस, गहू, सोयाबीन, मका, हरभरा यांचा मोठा साठा होता.

रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीत कोट्यवधींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती संमजते आहे.

Advertisement

दरम्यान महामंडळाच्या गोडाऊनला आग लागल्याचे समजताच संगमनेर नगरपरिषद, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाड्या बाजार समितीच्या आवारात दाखल झाल्या होत्या.

आगीने रौद्ररूप धारण केले होते. गोडाऊनच्या चारही बाजूंनी पाण्याच्या मारा करण्यात येत होता. मात्र, आग आटोक्यात येत नव्हती. घटनेची माहिती मिळताच संगमनेर तहसीलदार अमोल निकम,

Advertisement

शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, माजी नगरसेवक सोमेश्वर दिवटे, सामाजिक कार्यकर्ते भूपेश भळगट, सोमनाथ मुर्तडक हे घटनास्थळी पोहोचले.

नागरिकांनी बाजार समितीत मोठी गर्दी केली होती. आग वाढतच होती. रात्री साडे दहानंतरही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले नव्हते. त्यामुळे अकोले, राहुरी, सिन्नर, प्रवरानगर येथील अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले होते.

Advertisement

जेसीबीच्या सहाय्याने भिंत तोडून पाण्याचा फवारा मारण्यात आला. रात्री उशीरापर्यंत ही आग आटोक्यात आलेली नव्हती.

या आगीत नेमके किती नुकसान झाले, हे आग पूर्ण विझल्याशिवाय समजू शकणार नाही. मात्र, या गोडाऊनमध्ये लाखो रुपये किमतीचा साठा असल्याचे सांगण्यात येते.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li