अहमदनगर ब्रेकिंग : ऑक्सिजन न मिळाल्याने सात कोरोना रुग्णाचा मृत्यु ! शहरात खळबळ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-अहमदनगर येथील एका खासगी हॉस्पिटमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घडना घडली.

नगर जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यासाठी रोज 60 मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो.

त्यात सोमवारी 20 तर मंगळवारी 50 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला. मात्र, रुग्णांची संख्या रोजच वाढत असल्याने तो ऑक्सिजन अपुरा पडत आहे.

उपलब्ध झालेला 50 टन ऑक्सिजन जिल्हा रुग्णालय व शहरातील मोठ्या खासगी हॉस्पिटलला पाठवला जातो.

याबाबत समप्रमाणात व न्याय्य पद्धतीने वाटप होत नसल्याने अनेक हॉस्पिटलला ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याने तेथील रुग्णांचा जीव ऑक्सिजन अभावी गुदमरला आहे

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|