Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग ; अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार!

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-तू माझ्या सोबत चल, जर आली नाही तर मी आत्महत्या करेन, असे धमकावून साथीदाराच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले.

व नंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला.ही घटना जामखेड तालुक्यात घडली असून, या प्रकरणी दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

नितीन अगरचंद खाडे व बाबा दयाराम खाडे (दोन्ही रा.बाळगव्हाण ता.जामखेड) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पिडीत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी नितीन अगरचंद खाडे व बाबा दयाराम खाडे या दोघांनी संगनमत करून,

नितीन खाडे हा मला म्हणाला की, तू माझ्या सोबत चल,जर आली नाहीस तर तुला उचलून नेईल, तुझ्या बापाच्या घरात औषध पिऊन आत्महत्या करील.असे म्हणून या दोघांनी यांनी तीचे तोंड दाबून बळजबरीने मोटारसायकलवर बसवून पळवून नेले.

Advertisement

या नंतर आनंदवाडी शिवारातील उसाच्या शेतात घेऊन जाऊन तिच्याच ओढणीने तिचे हात पाय व रुमालाने तोंड बांधले व दमदाटी मारहाण करुन नितीन खाडे याने दोन दिवसात दोन वेळा तिच्यावर अत्याचार केला.

अशी फिर्याद पिडीत मुलीने दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुनील बडे हे करत आहेत.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li