कोरोना मुक्तीसाठी राज्याला २० दिवस महत्त्वाचे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- दिवसेंदिवस कोरोना संसर्गाची साखळी वाढत आहे. pकोरोनाला हद्दपार करण्यासाठी तसेच कोपरगाव मतदारसंघात कडक निर्बंध तसेच उपाय योजना, जनजागृती, असे विविध माध्यम फक्त प्रत्येकाने २० दिवस मिशनच्या माध्यमातून प्रयत्न केले,

तर निश्चितच मतदारसंघा बरोबर राज्य देखील कोरोना मुक्त होण्यास वेळ लागणार नाही, यासाठी असा एक प्रभावी कृती कार्यक्रम राबवावा, असे मत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजपच्या प्रदेशसचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.

आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील संजीवनी कोविड केअर सेंटरच्या पाहणीनंतर उपस्थित प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोल्हे बोलत होत्या.

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते,

वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, कोपरगाव शहराचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, ग्रामीण पोलिस निरीक्षक दौलत जाधव, स्वच्छता दूत सुशांत घोडके आदी उपस्थित होते.

कोरोनामुक्ती होण्यासाठी प्रथम कोरोना बाधित शोधणे गरजेचे असून त्यासाठी कोरोना चाचण्या अधिक होणे आवश्यक आहे.

रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींना सामाजिक सभागृहे, शाळा यासह उपलब्धे नुसार गावपातळीवर विलगिकरण करण्यात यावे. त्यामुळे इतरांमध्ये संसर्गाचा होणारा फैलाव कमी होऊ शकतो.

यासाठी माझा गाव कोरोनामुक्त गाव संकल्पना आणि शहरी भागात माझा वार्ड कोरोनामुक्त वार्ड असा उपक्रम राबविला जाणे गरजचे आहे. शासनाने आरोग्य यंत्रणेला गतिमान करण्यासाठी सर्व आमदार निधी हा कोरोना उपाययोजना करण्यासाठी शंभर टक्के वापरला जावा.

सर्वांनी एकोप्याने लढा देऊन २० दिवसांचा अजेंडा घेऊन काम सुरू केले, तर आपण कोपरगावबरोबर राज्य देखील कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू शकतो.

कोरोना रुग्णांच्या मनातील भीतीचे वातावरण काढून टाकून हा संसर्गामुळे होणारा आजार असून आपण सकारात्मक विचार करून योग्य उपचार घेतले, तर आपण सहज कोरोनाला हद्दपार करु शकतो.

यातून रुग्णांनाही मानसिक आधार देऊन भीतीचे वातावरण न ठेवता नागरिक स्वतःहून प्राथमिक आरोग्य केंद्रात जात तपासणी करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असे कोल्हे यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|