आदित्य ठाकरेंचे विरोधकांना उत्तर : सांत्वन टीव्हीवर बोलून नव्हे, तर मदत कशी हे मिळेल पाहावं…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-सांत्वन फक्त टीव्हीवर येऊन करायचं नाही, तर कुटुंबाशी बोलून मदत कशी मिळेल हे पाहिलं पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या

विरोधकांच्या या टीकेला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. एका वृत्त वाहिनीशी ते बोलत होते.

ते म्हणाले, एखादी दुर्घटना झाली की त्या ठिकाणी एक यंत्रणा काम करत असते. तिथे पोलीस, मेडिकल टीम, प्रसारमाध्यमं काम करत असतात. जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आमच्यापैकी कोणीही तिथं गेलं की आमच्यामागे यंत्रणा उभी राहते.

व्हीआयपी व्यक्तीने भेट दिली की तिथे काम करणारी सगळी यंत्रणा डायवर्ट होते. दुर्घटनेनंतर आरोग्यमंत्री, पालकमंत्री तिथे पोहोचून प्रत्येकाने जे काम करायचं असतं त्यासंबंधी सूचना देत असतात.

खूप वेळा वॉररुममध्ये राहून सर्व कामकाज कसं सुरु असतं हे पाहायचं असतं आणि सध्या तेच अपेक्षित आहे, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. फक्त आपल्याच नाही तर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून हे होत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सांगड घालून काम करायचं असतं ते दोन्ही जागांवरील प्रमुख करत असतात,” असंही त्यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “आम्ही गेल्यावर तिथे गोंधळ होतो. अर्धा पाऊण तास सगळं काही थांबलेलं असतं.

आम्ही बाईट देत असतो, नंतर प्रसारमाध्यमं व्हीआयपी दौरा, टुरिझम अशी टीका करतात. प्रत्येक जिल्ह्याचा एक पालकमंत्री असतो, तेथील काही ठराविक लोकप्रतिनिधी असतात. तिथे पोहोचून हवी ती मदत ते करत असतात.

एकत्र काम केल्यानंतर प्रत्येकाने टीव्हीवर जाण्याची गरज नसते, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|