Breaking News Updates Of Ahmednagar

मोठमोठ्या सभा, गर्दीचे सोहळ्यांमुळे भारतात कोरोनाचा उद्रेक….

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-मोठमोठ्या सभा, प्रचंड गर्दीचे सोहळे, कोरोनाचे अनेक व्हेरिएंट आणि मंदगतीने होणारे लसीकरण यामुळे भारतातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,

असे स्पष्ट परखड मत जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रवक्ते तारिक जसारेव्हिव यांनी नोंदवले आहे.

Advertisement

भारतातील भयावह कोरोना लाटेसाठी विषाणूचे केवळ एक म्युटेशन जबाबदार नाही. त्यामागे ही अनेक कारणे आहेत, असे जसारेव्हिव यांनी म्हटले आहे. भारतात आलेल्या कोरोना सुनामीसाठी केवळ एक म्युटेशन जबाबदार नाही.

कोरोनाचे नियम पाळले नसल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. गेल्या काही आठवड्यात आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे भारतातील आरोग्य व्यवस्था पूर्णत: कोलमडण्याच्या मार्गावर आहे, याकडे जसारेव्हिव यांनी लक्ष वेधले.

Advertisement

कोरोना रुग्णांपैकी केवळ १५ टक्के लोकांना रुग्णालयात उपचारांची गरज पडते. त्यामध्येही अत्यंत कमी रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. मात्र योग्य माहिती मिळत नसल्याने भारतात लोक आपल्या नातेवाइकांना रुग्णालयात भरती करण्याची घाई करीत आहेत.

८५ टक्के रुग्णांवर घरीच उपचार केले जाऊ शकतात. लोकांना घरगुती उपचाराविषयी माहिती देणे गरजेेचे आहे, असे तारिक म्हणाले.

Advertisement

तर अध्यक्ष तेद्रोस अॅडहॉनम घेब्रयासिस म्हणाले, भारताला ४००० ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटरचा पुरवठा केला जाणार असून २ हजार तज्ज्ञांचा ताफाही भारतात पाठवला जाणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li