Breaking News Updates Of Ahmednagar

गिरीशभाऊ, तुम्हाला हांजीहांजी करून, तर मला स्वकर्तृत्वाने सगळं मिळालं

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पाहणं काही गैर नाही. मी तरी मुख्यमंत्रिपदापर्यंत गेलो. तुम्ही तर तिथपर्यंतही जाऊ शकले नाहीत.

हांजीहांजी करून तुम्हाला हे सगळं मिळालं आहे. मला स्वकर्तृत्वाने सगळं मिळालं आहे, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार गिरीश महाजन यांना दिले.

Advertisement

ऑडिओ क्लिपमध्ये खडसेंनी भाजपाचे आमदार महाजन यांच्याबद्दल केलेल्या उल्लेखामुळे गिरीश महाजनांनी खडसेंवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली होती. त्याला खडसेंनी प्रत्युत्तर दिले. खडसे म्हणाले, गिरीशभाऊंना राजकारणात जन्माला मी आणलं आहे.

त्यांच्या अनेक निवडणुकांना आर्थिक मदत मी करत आलो आहे. प्रचाराला मी स्वत: गल्लोगल्ली फिरलो आहे. म्हणून आज गिरीशभाऊ इथे दिसत आहेत. माझा दोष इतकाच आहे की मी कुणाचे पाय चाटले नाहीत आणि कुणाची हांजीहांजी केली नाही.

Advertisement

ती मला सवयही नाही. आपण अनेकांना घडवतो. अनेक लोकं प्रामाणिक राहतात, काही लोकं गद्दारी करतात. असे प्रसंग जीवनात घडत राहतात, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. दरम्यान,

यावेळी एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना १९९४-९५मध्ये घडलेल्या एका घटनेची आठवण देखील करून दिली. गिरीशभाऊंना मी आत्ता ओळखत नाहीये. १९९४-९५ मध्ये फर्दापूरला अशाच प्रकारची घटना घडली होती.

Advertisement

तेव्हापासून आजतागायत सगळा इतिहास मला माहितीये आणि सगळ्या जनतेलाही माहिती आहे. माझं संतुलन वगैरे काहीही बिघडलेलं नाही. त्या मतदारसंघातून मला गेल्या आठवड्याभरात तक्रारी आणि अडचणींचे खूप फोन आले.

इंजेक्शन मिळत नाहीत, हॉस्पिटलमधून पैशांशिवाय मृतदेह देत नाहीत अशा तक्रारी माझ्याकडे लोकांनी केल्या आहेत. इकडे लोकांचे मुडदे पडत होते

Advertisement

आणि त्याच काळात गिरीशभाऊ महिनाभर पश्चिम बंगालमध्ये प्रचार करत होते. त्यासंदर्भात लोकांचा संताप ते माझ्याकडे व्यक्त करायचे. त्यावर मी बोललो”, असे खडसे म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li