Breaking News Updates Of Ahmednagar

रेमडेसिवीरबाबत फसवणूक टाळण्यासाठी हे लक्षात ठेवा

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, यातून आपली फसवणूक होऊ शकते.

बनावट रेमडेसिवीर कसे ओळखावे व योग्य रेमडेसिवीरबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयपीएस अधिकारी मोनिका भारद्वाज यांनी ट्वीट केले आहे. रेमडेसिवीरच्या ओळखीसाठी मदत होईल.

Advertisement

असे ओळखा योग्य रेमडेसिवीर 100 मिली. ची बॉटल असते. बॉक्स आणि बॉटलवर तसे स्पष्ट नमूद असते.

ही बॉटल उघडल्यानंतर एकदाच वापरात आणली जाते.

Advertisement

सर्व इंजेक्शन 2021 मध्ये बनले आहेत.

  • – काचेची बॉटल खुपच नाजूक असते.
  • – इंजेक्शन फक्त पावडर स्थितीच मिळते.
  • – बॉक्सच्या मागे बार कोड तयार केलेला असतो.
  • – इंजेक्शनच्या सर्व बॉटलवर RxRemdesivir लिहलेले असते.
  • – खोट्या रेमडेसिवीरच्या बॉक्सवर पत्त्याचे स्पेलिंग चुकवलेले असते. जसे की Telangana चे

Telagana. देशात काही ठिकाणी रेमडेसिवीरच्या नावाखाली बनावट इंजेक्शन औषध विकले गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Advertisement

बारामतीत देखील बनावट इंजेक्शन बनवल्यामुळे दोघा तरुणांना अटक झाली होती. देशात आणि राज्यात या घटना अत्यंत अपवादात्मक असल्या तरी, फसवणूक टाळण्यासाठी योग्य औषधं – इंजेक्शनची आपल्याला माहिती हवी.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li