Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’मृत्यूंचे गुढ कायम !

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-अहमदनगर शहरातील एका खासगी रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने सात जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रशासनाने तत्काळ संबंधित हॉस्पिटलची चौकशी करून सदर मृत्यू ऑक्सिजन न मिळाल्याने नव्हे तर कोरोना आणि इतर गुंतागुंतीच्या आजारांमुळे झाल्याची सारवासारव केली आहे.

Advertisement

एकीकडे जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन साठा असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करत असताना दुसरीकडे एमआयडीमधील खासगी ऑक्सिजन प्लँटसमोर टँकरच्या रांगा लागलेल्या आहेत.

त्यातच शहरातील स्टेशन रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री करोना उपचार सुरू असणार्‍या 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती बुधवारी सकाळी समोर आली. त्यानंतर प्रशासन आणि आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले.

Advertisement

मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले.

हॉस्पिटल प्रशासनाने याबाबत माध्यम प्रतिनिधीसमोर खुलासा करत रूग्णांचा मृत्यू झाल्याची कबूली दिली. परंतू, हे मृत्यू ऑक्सिजनअभावी झाले नसल्याचा दावा त्यांनी केला.

Advertisement

रूग्ण गंभीर अवस्थेत असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी सात करोना रुग्णांचा मृत्यू कसा झाला, याबाबत गुढ वाढले आहे.

नगर जिल्ह्यात ऑक्सिजनची तीव्र टंचाई आहे. जिल्ह्यासाठी रोज ६० मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो. त्यात सोमवारी २० तर मंगळवारी ५० मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला. ऑक्सिजन सिलिंडर आणण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितले जाते.

Advertisement

तिथे रांगा असल्याने खासगी रिफिलिंग प्लांटवर दहा ते बारा तासांनी ऑक्सिजन मिळतो. हीच परिस्थिती एका खासगी रुग्णालयातील रुग्णांवर बेतली व त्यातच रुग्णांचा मृत्यू झाला, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li