Breaking News Updates Of Ahmednagar

जिल्ह्यात अद्यापही ‘त्या’ इंजेक्शनचा काळाबाजार सुरूच!

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, आता तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत.

त्यामुळे जिल्हा व तालुका स्तरावरील जवळपास सर्वच रुग्णालयात उपचारासाठी बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांची कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या रेमडीसिव्हीर या इंजेक्शन मिळवण्यासाठी धावाधाव होत आहे.

Advertisement

वेळप्रसंगी यासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम रक्कम मोजावी लागत आहे. नुकताच असा प्रकार पाथर्डी तालुक्यात घडला आहे. अवघ्या दोन हजार रुपयाच्या इंजेक्शनसाठी तब्बल विस हजार रुपये मोजावे लागल्याची घटना घडली आहे.

परंतु रुग्णांच्या जीवनमरणाचा प्रश्न असल्याने हे इंजेक्शन घेणारा व विकणारा दोघेही व्यवहाराबाबत बाहेर चर्चा करत नाहीत. परिणामी प्रशासनास याविषयी माहिती नसती. म्हणजे कारवाईचा सवालच येत नाही.

Advertisement

येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या या रुग्णाचा एक नातेवाईक ‘या’ इंजेक्शनसाठी तिन तालुक्यात फिरुन आला, मात्र त्याला ते मिळाले नाही. अखेर ओळखीच्या मदतीने त्याला ते इंजेक्शन मिळाले, परंतु त्यासाठी तब्बल विस हजार रुपये मोजावे लागले.

परंतु अशा बिकट परिस्थितीत पैशापेक्षा नातलगाचा जिव वाचला हेच खुप महत्त्वाचे असल्याने काळाबाजार होत असला तरी याबाबत कोणी तक्रार करत नाही. परिणामी रुग्णांची गरज महत्वाची असल्याने काळाबाजार करणा-यांची माहीती समोर येत नाही.

Advertisement
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
li