‘ग्रामसुरक्षा यंत्रणा’ गुन्हेगारी रोखण्यासह कोरोना मदतकार्यातही ठरतेय वरदान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच तालुक्यातील प्रत्येक प्रशासकीय विभागाच्या कामकाजात मदत होऊन नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कर्जत पोलिसांकडुन कार्यान्वित करण्यात आलेली ‘ग्रामसुरक्षा यंत्रणा’ तालुक्यासाठी वरदान ठरत आहे.

विशेष म्हणजे कोरोना मदतकार्यातही या यंत्रणेचे मोठे योगदान आहे. लोकहिताचा हेतू व नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी ही यंत्रणा सुरू करण्याबाबत कर्जत पोलिस स्टेशनच्या वतीने ही संकल्पना मांडण्यात आली होती.

पोलिस अधीक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव आदींनी यास दुजोरा दिला. आ.रोहित पवारांनी पुढाकार घेत यासाठी पत्रव्यवहार केला.

ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी कर्जत पोलिसांनी परिश्रम घेत अनेक प्रात्यक्षिके घेतली.कर्जतच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना व नागरीकांना सहभागी करत कार्यशाळा घेतल्या.

आता पोलिस यंत्रणेबरोबरच सर्वच विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडुन या यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करण्यात येत असुन नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सुटत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासन व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचना व माहिती याच ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत एकाच फोनकॉलवर नागरीकांपर्यंत तात्काळ पोहचत आहेत.गुन्हेगारी व अनुचित घटना रोखण्यास मदत होत आहे.

मागील काही दिवसांपूर्वी चांदे येथे आग लागली होती आणि तेथील प्रतिनिधींच्या एकाच कॉलवर ७० ते ८० ग्रामस्थ काही वेळातच घटनास्थळी जमले व आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील अनर्थ टळला.कोरोना काळात सध्या पंचायत समिती,

नगरपंचायत सक्षमपणे या यंत्रणेचा वापर करत लसीकरण,कोरोना चाचण्या,पाणी, घनकचरा, पाणीपट्टी, घरपट्टी आदींची माहिती नागरिकांना देत आहेत.कर्जतच्या पोलीस यंत्रणेने राबवलेल्या

या उपक्रमाचा मोठा फायदा कर्जतच्या सर्वच प्रशासनाला आणि नागरिकांना होत आहे.सर्व नागरीकही प्रशासनाच्या कामात सहभागी होऊन त्यांना मदत करताना दिसत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|