Breaking News Updates Of Ahmednagar

अहमदनगर ब्रेकिंग : बॉम्बस्फोटात दोन जण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-तालुक्यातील नारायणडोह गावात एका शेत वस्तीवर झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जण जखमी झाले आहेत.

बुधवारी (दि. २८) सायंकाळी ही घटना घडली. बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर चार किलोमीटर परिसरात त्याचे हादरे जाणवले. सुदैवाने त्या बॉम्ब मधील केमिकलचा भडका उडाला नाही, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.

Advertisement

याबाबत सविस्तर हकीगत अशी की, नगर तालुक्यातील नारायणडोह येथे गावापासून दूर असणाऱ्या बाबासाहेब रामराव फुंदे यांच्या वस्तीवर जाण्यासाठी रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला होता. या मुरुमात पिन असणारा जुन्या काळातील बॉम्ब होता.

दरम्यान, शेतात गवत काढण्यासाठी आलेल्या फुंदे यांच्या पत्नी मंदाबाई यांना तो बाॅम्ब गोळा सापडला. त्या महिलेने तो बाॅम्ब गोळा जवळ शेतात काम करत असलेल्या अक्षय साहेबराव मांडे या युवकाकडे दिला.

Advertisement

त्याने तो बाॅम्बगोळा जमीनीवर आपटला. यावेळी मोठा स्फोट झाला. यात, अक्षय व मंदाबाई फुंदे हे दोघे जखमी झाले आहेत.

या धमक्याचा आवाज 3 ते 4 कि.मी पर्यंत गेला. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांनी पथकासह भेट दिली.

Advertisement

यानंतर घटनास्थळाची बाॅम्ब शोधक पथकाने पाहणी केली. या गावाच्या परिसरात अजून काही बॉम्ब आहेत का याची तपासणी बॉम्बशोधक पथकाने केली आहे. मात्र इतर ठिकाणी बॉम्ब आढळून आलेला नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

Advertisement
Advertisement
li