खा. सुजय विखे रेमडेसीवीर प्रकरणाचा तपास डॅशिंग अधिकारी डिवायएसपी संदीप मिटके यांच्‍याकडे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :-अहमदनगर चे खासदार सुजय विखे पाटील यांनी दिल्लीवरून आणलेल्या रेमडीसियर इंजेक्शन विषयी चे प्रकरण राज्यभर गाजत असताना आता या प्रकरणाचा तपास डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असणारे श्रीरामपुर उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

नुकतेच डिवायएसपी संदीप मिटके हे आपल्या पथकासह शिर्डी विमानतळावर पोहचले असुन विमानतळ अधिकाऱ्याची चर्चा करून फुटेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती सुञांकडून समजली आहे.

त्यामुळे खासदार सुजय विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. खासदार डॅा.सुजय विखे यांनी दिल्लीवरून विमानाने आणलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शन प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती.

या प्रकरणात अक्षेप घेत सर्वसामान्यांना एक इंजेक्शन मिळत नसताना खासदार विखे यांना एवढ्या मोठ्या संख्येने इंजेक्शन कसे मिळाली असा सवाल करून काही याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर काल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली. त्यात या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश न्यायलयाने पोलिसांना दिले आहे.

तसेच गृह विभागाचे प्रधान सचिव यांना शिर्डी विमानतळावर १० एप्रिल ते २५ एप्रिल पर्यंत च्या तारखांना आलेल्या सर्व खाजगी विमानांचे सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहे.

तरी आत्ता समजलेल्या ताज्या माहितीनुसार नगर पोलीस अधीक्षक श्री. मनोज पाटील यांनी या प्रकरणाचा तपास डॅशिंग अधिकारी डिवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे दिला आहे.

डीवायएसपी संदीप मिटके यांनी नुकत्याच झालेल्या राहुरी शहरातील पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणात मोठ्या राजकीय व्यक्तींचे नाव आल्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजले होतं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी देखील या प्रकरणात लक्ष घातले होतं त्यानंतर तात्काळ या प्रकरणाचा तपास संदीप मिटके यांच्याकडे देण्यात आला होता.

मिटके यांनी आठच दिवसात यातील मुख्य आरोपीसह फरार आरोपींच्या परराज्यात जावुन मुसक्या आवळल्या होत्या.त्यानंतर हे प्रकरण शांत झाले होते.

आता तर खुद्द खासदार सुजय विखे इंजेक्शन प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूरचे डीवायएसपी संदीप मिटके हे करणार असून यामध्ये त्यांची नेमकी कशी कामगिरी होते आणि या प्रकरणात आता काय निष्पन्न होणार हे बघने औचित्याचे ठरणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|